पुणे -मुंबई विद्यापीठाच्या नाट्य विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केली होती. फेसबुकद्वारे मांडलेल्या भूमिकेवर आपण आजही ठाम असल्याचे मत योगेश सोमण यांनी सांगितले. पुण्यात शिवसेना चित्रपट सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मी फक्त माझं मत मांडले होते आणि माझ्या मतांवर मी आजही ठाम आहे - योगेश सोमण
योगेश सोमन यांनी काही दिवसापूर्वी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून टीका केली होती. फेसबुकद्वारे मांडलेल्या भूमिकेवर आपण आजही ठाम असल्याचे योगेश सोमण यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आटर्स विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी वि. दा. सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधीचा समाचार घेतल्यामुळे एनएसयुआयच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी 8 जानेवारीला आंदोलन करून त्वरित योगेश सोमण यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. यानंतर विद्यापीठाने संचालक योगेश सोमण यांना तातडीने रजेवर पाठवले आहे. पुढील कारवाई होईपर्यंत योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.