पुणे - प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. येवले चहाला रंग येण्यासाठी रंगाचा वापर होत असल्याचे या अहवालातून सिद्ध झाले आहे. फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडीयाच्या (FSSAI) गाईडलाईननुसार रंगाचा वापर करणे चुकीचे आहे.
हेही वाचा... गोंदियात परदेशी प्रशिक्षकांकडून विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे
पुण्यातील येवले चहाच्या आऊटलेटवर यापूर्वीही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. त्यांचे कोंढव्यातील आऊटलेट बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. चहा तयार करण्यासाठी लागणाऱ्या चहापत्ती आणि साखरेच्या पाकिटावर कोणतीही माहिती नसल्याने ही कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा... मुंबईतील पालिकेच्या शाळांमध्ये लागणार ४ हजार सीसीटीव्ही कॅमेरे
काही महिन्यांपूर्वी येवले चहामध्ये मेटामाईन नावाचा पदार्थ वापरला जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी आपली भूमिका मांडत असा कुठलाही पदार्थ वापरत नसल्याचे स्पष्ट केले होते.