पुणे -नागरिकत्व नोंदणी, सुधारणा कायदा हा काळा कायदा असून तो मागे घ्यावा, ही मागणी घेवून गांधी शांती यात्रा आम्ही सुरू केली आहे. संविधान रक्षण करणे, एकतेचा संदेश देणे आणि गांधीजींना पुन्हा मरू न देणे, हा हेतू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुण्यात केले. गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते राजघाट (दिल्ली) गांधी शांती यात्रा गुरुवारी सुरू झाली. गुरुवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाली. यावेळी पुण्यातल्या गांधीभवन येथे जाहीर सभा घेण्यात आली, ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ कुमार सप्तर्षी उपस्थित होते.
#CAA हा काळा कायदा, तो मागे घ्यावा यासाठी 'गांधी शांती' यात्रा - यशवंत सिन्हा
नागरिकत्व नोंदणी सुधारणा कायदा हा काळा कायदा असून तो मागे घ्यावा, ही मागणी घेवून आम्ही ही गांधी शांती यात्रा सुरू केली आहे. गांधीजींना पुन्हा मरू न देणे हा हेतू आहे, असे मत यावेळी यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला, 'देशाविरुद्ध सध्या काम चालू आहे. शांतता धोक्यात आणली जात असून देशाला याची किंमत मोजावी लागेल, अशी भीती व्यक्त करत छूपा अजेंडा पुढे आणला जात आहे. गांधींचा विचार मारण्याचे कारस्थान चालू आहे. राजकीय विचारांच्या पुढे जाऊन संविधान विचाराची लढाई लढण्याची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले. दरम्यान गांधी भवन येथे जाहीर सभा घेण्यात आली. शुक्रवारी ही यात्रा पुढील प्रवासाला निघेल.