महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात अकरा लाखा किंमतीचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक - drugs seized news

पोलीस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल अकरा लाखा किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Anti-Drug Squad Pune
अमलीपदार्थ विरोधी पथक पुणे

By

Published : Oct 26, 2020, 11:20 AM IST

पुणे-पोलीस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल अकरा लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. विसारत अली सना उल्ला (वय 32) आणि ब्रिजेश उपेंद्र शर्मा (वय 38) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

हेही वाचा-कंगना रणौतची आज पोलीस चौकशी; हजर राहणार की नाही याकडे लक्ष

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी कात्रज परिसरात गस्त घालत होते. दरम्यान त्यांना जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या इमारतीसमोर उभ्या असलेल्या एका स्विफ्ट कारमध्ये दोन व्यक्ती संशयास्पद अवस्थेत हालचाल करताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत कारची झडती घेतली. तर त्यांच्याजवळ 212 ग्रॅम (मेफेड्राॅन) सापडले. याची किमत 10 लाख 63 हजार इतकी आहे.

हेही वाचा-तुम्हाला महाराष्ट्राचे ठेकेदार कोणी बनवले? कंगनाचा उद्धव ठाकरेंना सवाल


गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. त्यांची कार, जवळील रोख मुद्देमाल आणि मेफेड्रोन असा एकूण पंधरा लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कलम 8(क), 22(क),29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details