पुणे :स्त्री ही युगाची जननी आहे. तसेच दुर्गेची आपण पूजाही करतो. आज महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीत्वाची नव्याने ओळख करून देणाऱ्या चित्राबाबत माहिती घेऊया. या चित्राला राज्य सरकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. सचिन निंबाळकर यांचे कलियुग नावाचे चित्र आहे. या चित्रामध्ये एक स्त्री आणि तिच्या समोर वाघ आहे. यांच्या पार्श्वभूमीवर पुरातन प्रचलित कथा महिषासुर मर्दिनीची प्रतिमा चितारली आहे. सध्याच्या समाज व्यवस्थेवर भाष्य करणारे हे चित्र आहे.
Women's day 2022 : स्त्रीत्वाची महती सांगणाऱ्या 'या' चित्राला मिळाला राज्य शासनाचा पुरस्कार - womens day 2022
राज्य शासनाने सचिन निंबाळकरांच्या चित्राची दखल घेत कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य ६१ महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये कलाकार विभागातील राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. आज जागतिक महिला दिनाच्या ( Women's day 2022 ) निमित्ताने या चित्राविषयी जाणून घेऊया..
याची दखल राज्य शासनाने घेऊन या चित्राला कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य ६१ महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनमध्ये कलाकार विभागातील राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. 'जेव्हा एखादी स्त्री अन्यायाच्या विरोधात उभी राहते आणि दुर्गेचे रूप प्राप्त करतो त्यावेळेस ती सर्व अरिष्ठांना नष्ट करते. महिषासुरमर्दिनी हे स्त्री शक्तीचे प्रतिक आहे. माझ्या चित्रांमध्ये या पुरातन कथेचा संदर्भ घेऊन सध्याच्या समाजाचे चित्रण केले आहे. चित्रातील स्त्री आणि वाघ स्थिर आहेत. मात्र त्याच्या मागे खूप काही दडलेले आहे. ती स्त्री जेव्हा सर्व सहनशीलतेच्या मर्यादा ओलांडेल तेव्हाच ती सर्व विकृतीचा नाश करून सर्वत्र पुन्हा शांती प्रस्थापित करेल,' असे मत चित्रकार सचिन निंबाळकर यांनी व्यक्त केले.