पुणे - कोणताही क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी हे खरं सूत्र आहे. महिला या उद्योग विश्वात स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करतात ही समाजासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. तसेच महिलांसाठीच्या विविध उपक्रमाला प्रोत्साहन देणे आमचे कर्तव्य असल्याचे गुप्ता यावेळी म्हणाले.
महिला उद्योग विश्वात स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करतात ही समाजासाठी अभिमानाची बाब - अमिताभ गुप्ता - महिलांचा उद्योग विश्वात सहभाग
कोणताही क्षेत्रात यशाचे शिखर गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी हे खरं सूत्र आहे. महिला या उद्योग विश्वात स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करतात ही समाजासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
यावेळी आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासमोर महिलांनी पुणे शहरातील विविध विषय, महिलांचे प्रश्न मांडले. त्यावेळी अतिशय सकारात्मकरितीने गुप्ता यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी आपल्याला व आपल्या महिला आघाडीसाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. तसेच फिक्की महिला आघाडीसोबत भविष्यात शहरात विविध समाजउपयोगी उपक्रम करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फिक्की महिला विंगमधील महिला उद्योजिकांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी फिक्की महिला आघाडी अध्यक्ष नीलम सेवलेकर यांनी दिली. महिला उद्योजिकांना दिशा देण्यासाठी आगामी काळात विविध उद्योग मार्गदर्शन शिबीर, परिषदा तसेच कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.