महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलेचा सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Prostitutes

पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत देहविक्री करणाऱ्या एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमैया सलीम शेख असे या महिलेचे नाव आहे.

pune police
pune police

By

Published : Jun 23, 2021, 10:06 PM IST

पुणे - पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत देहविक्री करणाऱ्या एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुमैया सलीम शेख असे या महिलेचे नाव आहे. तीचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत सुमैया शेख ही बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होती. मूळची पश्चिम बंगाल येथील असलेली सुमैया मागील काही दिवसांपासून समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भाड्याच्या घरात राहत होती. एका सलून व्यावसायिकासोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

4 दिवसानंतरही शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त नाही

दरम्यान, चार दिवसांपूर्वी तिच्या घरातून उग्र स्वरूपाचा वास येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित घरात जाऊन पाहणी केली असता सडलेल्या अवस्थेत सुमैया हिचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता. चार दिवसानंतरही शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नाही.

दरम्यान, प्राथमिक तपासादरम्यान सुमैया हिचा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे. समर्थ पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा -पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा!!! पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा

ABOUT THE AUTHOR

...view details