पुणे -पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहित महिलेला डुकराचे मटण खाण्यासाठी जबरदस्ती करून जीवे मारण्याची धमकी सासरच्या व्यक्तींनी दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच दिराने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचे देहूरोड पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पती, सासू आणि दिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
खळबळजनक...डुकराचे मटण खाण्यासाठी विवाहितेला सासरच्यांकडून जीवे मारण्याची धमकी - देहूरोड पोलीस न्यूज
विवाहित महिलेला डुकराचे मटण खाण्यासाठी जबरदस्ती करून जीवे मारण्याची धमकी सासरच्या व्यक्तींनी दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच दिराने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचे देहूरोड पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
![खळबळजनक...डुकराचे मटण खाण्यासाठी विवाहितेला सासरच्यांकडून जीवे मारण्याची धमकी Dehuroad police news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-01:15:45:1596872745-mh-pun-03-av-pig-meet-mh10024-08082020125536-0808f-1596871536-196.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला देहूरोड परिसरात राहण्यास आहे. 11 जून ते शुक्रवार 7ऑगस्ट या काळात त्यांच्यासोबत सासरचे व्यक्ती मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी शिवीगाळ करुन डुक्कराचे मटण खाण्यासाठी जबरदस्ती करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार संबंधित महिलेने दिली आहे.
माहेरहून चारचाकी गाडी आण असे म्हणून पतीने पट्टयाने मारहाण करून दुखापत केली,असेही तक्रारदार महिलेने सांगितले. दरम्यान, दिराने शिवीगाळ करुन तक्रारदारांकडे यांच्याकडे शारिरिक संबंधाची मागणी करुन त्यांच्या मनास लज्जा निर्माण होईल,असे वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटतर आहे. या गंभीर घटनेचा देहूरोड अधिक तपास करत आहेत.