पुणे - घरभाडे आणि लाईट बिल भरण्यासाठी जमा केलेले पैसे नवऱ्याने दारू पिण्यासाठी खर्च केले. याबद्दल जाब विचारला असता, नवऱ्याने तिला त्रास दिला. व त्यांच्यात वाद निर्माण झाला. या रागाच्या भरात हतबल झालेल्या विवाहितेने राहत्या घरात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोरे चाळमध्ये 12 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.
पुण्यात घरभाडे-लाईट बिलच्या पैशांची पतीने घेतली दारु, पत्नीची पेटवून घेत आत्महत्या - पेटवून घेऊन आत्महत्या
अंकिता कुंदन कांबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कुंदन राजू कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकिता कुंदन कांबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कुंदन राजू कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विवाहितेचे वडील व्यंकट नागोराव जाधव (वय 52) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासून कुंदन कांबळे हा पत्नी अंकिता कांबळे हिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. तो तिच्या चारित्र्यावर संशय देखील घ्यायचा असे तक्रारीत म्हटले आहे. 12 एप्रिलला कुंदन कांबळे यांनी घर भाडे आणि लाईट बिल भरण्यासाठी जमा केलेले पैसे दारू पिण्यामध्ये खर्च केले होते. यावर पत्नी अंकिता हिने विचारणा केली असता, त्यांनी तिलाच त्रास दिला. त्याच्या या त्रासाला कंटाळून अंकिता हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.