महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Lady Driver Save Lives : चालू बसमध्ये ड्रायव्हरला अचानक आले फिट.. महिलेने गाडी चालवत वाचवले प्राण - महिलेने गाडी चालवत वाचवले प्राण

महिलाही कोणत्याच बाबतीत पुरुषांच्या तुलनेत कमी नाही, हे सिद्ध करून देणारा प्रसंग नुकताच पुण्यात घडला आहे. बस चालवत असताना बसच्या चालकाला अचानक फिट आल्याने तो खाली ( Bus Driver Fell Down Due To Fit ) पडला. प्रसंगावधान राखत बसमधील एका महिलेने बसच्या स्टिअरिंगचा ताबा घेत बस चालवत चालकाचे प्राण ( Pune Lady Driver Save Lives ) वाचवले.

चालू बसमध्ये ड्रायव्हरला अचानक आले फिट.. महिलेने गाडी चालवत वाचवले प्राण
चालू बसमध्ये ड्रायव्हरला अचानक आले फिट.. महिलेने गाडी चालवत वाचवले प्राण

By

Published : Jan 14, 2022, 2:31 AM IST

पुणे - वाघोलीतील महिलांच्या ग्रुपला पर्यटनासाठी बसमधून नेणाऱ्या बसचालकाला अचानक फिट ( Bus Driver Fell Down Due To Fit ) आले. त्यावेळी बसमधीलच योगिता सातव यांनी प्रसंगावधान राखून बस चालकाला वैद्यकीय उपचारासाठी व महिलांना सुखरूप इच्छित स्थळी पोहचविल्याची घटना नुकतीच ( Pune Lady Driver Save Lives ) घडली. त्यांच्या धाडसाचे कौतुक वाघोली परिसरातून केले जात आहे.

चालू बसमध्ये ड्रायव्हरला अचानक आले फिट.. महिलेने गाडी चालवत वाचवले प्राण

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

वाघोली येथील महिलांचा ग्रुप मिनी बसने मोराची चिंचोली येथे पर्यटनासाठी गेले होते. अचानक बस चालकाला फिट आल्याने तो खाली पडला आणि ते पाहून बसमधील महिलाही घाबरल्या. प्रसंगवधान राखत योगिता सातव यांनी बस चालवत बस चालकाला रुग्णालयात आणि महिला ऐच्छिक स्थळी पोहचवल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. त्यांचा हा बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details