बारामती - महिलेवर बलात्कार करत तिला खोलीत कोंडून ठेवल्याप्रकरणी राजकुमार उर्फ बावड्या पांडुरंग लिंबरकर (वय ४६ ) याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. याबाबत ३२ वर्षीय पीडितेने फिर्याद दाखल केली आहे.
बारामतीतील महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल - बारामती पोलिस बातमी
बारामतीतील महिलेवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बारामतीतील महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल
२३ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भावड्या लिंबरकर याने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोलीत नेले. तेथे तिला हाताने मारहाण करत तिच्यावर बलात्कार करून खोलीत कोंडून ठेवले असल्याचे फिर्यादीत तीने म्हटले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत.