महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Woman Died : लाकडी शेड कोसळून आंबेगावातील माजी सरपंचाचा मृत्यू - लाकडी शेड कोसळून आंबेगावातील माजी सरपंचाचा मृत्यू

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जवळे गावत लाकडाचा कौलारू शेड कोसळून माजी सरपंच रंगूबाई धोंडिभाऊ काळे (वय ५०) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज ( 11 जुलै ) दुपारी दोन वाजल्याच्य सुमारास घडली ( Woman Died wood shed collapsed in ambegaon pune ) आहे.

Pune Woman Died
Pune Woman Died

By

Published : Jul 11, 2022, 7:18 PM IST

पुणे -पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात दगड कोसळल्याच्या तर काही भागात भिंत पडीच्या घटना घडल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जवळे गावत लाकडाचा कौलारू शेड कोसळून माजी सरपंच रंगूबाई धोंडिभाऊ काळे (वय ५०) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज ( 11 जुलै ) दुपारी दोन वाजल्याच्य सुमारास घडली आहे. त्यांच्या मागे पती, सासू, मुलगा असा परिवार आहे. त्यांनी २०१५ ते २०२० या कालावधीत गावचे सरपंच भूषवले ( Woman Died wood shed collapsed in ambegaon pune ) होते.

आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील लायगुडे मळ्यातील माजी सरपंच रंगुबाई धोंडीभाऊ काळे यांच्या घराशेजारी कौलारू लाकडी शेड होता. त्यामध्ये स्वयंपाक व इतर कामे केली जायची. दुपारच्या सुमारास रंगुबाई एकट्याच बसल्या होत्या. सतत सुरू असलेल्या पाऊसाने शेड रंगूबाई यांच्या अंगावर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांच्या मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

हेही वाचा -Shivsena : शिवसेनेची 'धनुष्यबाणा'बाबत निवडणूक आयोगाकडे धाव; 'आमची बाजू ऐकून घ्यावी, मगच...'

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details