पुणे -पुण्यातील आंबेगाव खुर्द भागात आठव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळल्याने ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कपडे वाळत घालत असताना तोल जाऊन खाली पडल्याचे सांगितले जात आहे. केसरीदेवी हरिजीसिंग (वय ५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
कपडे वाळत घालताना आठव्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू - bharati vidhyapith police
कपडे वाळत घालत असताना तोल जाऊन खाली पडल्याचे सांगितले जात आहे. केसरीदेवी हरिजीसिंग (वय ५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
![कपडे वाळत घालताना आठव्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू पुणे पोलीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13004553-831-13004553-1631093374026.jpg)
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग कुटूंबीय आंबेगाव खुर्दमधील दत्तनगर भागात असलेल्या बहुमजली लेकवुड या नामांकित सोसायटीत आठव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ८०२ येथे राहत होते. त्यांचा मुलगा व सून नोकरीनिमित्त पुण्यात असतात. मूळचे सिंग हे उत्तरप्रदेशमधील आहेत. दरम्यान, त्या मुलाकडे तीन ते चार दिवसांपुर्वीच आल्या होत्या. त्या अधून-मधून मुलाकडे येत असत, असे पोलीसांनी सांगितले आहे. मंगळवारी (काल) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास त्या गॅलरीत कपडे वाळत घालण्यासाठी आल्या होत्या. कपडे वाळत घालत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्या. नातेवाईकांनी तत्काळ त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाने याची माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.