पुणे -सामाजिक सुरक्षा पथकाने आळंदीत गांजा तसेच बेकायदेशीर दारू विकणाऱ्या महिलेला सापळा रचून अटक केली आहे. तिच्याकडून ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पत्रकार परिषद घेऊन संबंधित घटनेची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. या प्रकरणी अंबिका मारुती गरुड (वय-५५, रा.आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त आळंदीत दारू आणि गांजा विकणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या महिलेला घेतले ताब्यात
पिंपरी-चिंचवड शहरात सामाजिक सुरक्षा पथकाची कौतुकास्पद कामगिरी दिसून आली आहेत. दरम्यान, आज आळंदीत सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून आरोपी महिलेला ताब्यात घेतले, तिच्याकडून पोलिसांना लाखोंचा मुद्देमाल मिळाला आहे.
आळंदीत दारू आणि गांजा विकणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल केला जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीतील घुंडरे आळी येथे एक महिला अवैद्य दारू विक्री आणि गांजा विक्री करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांना मिळाली होती. त्यानुसार, संबंधित ठिकाणी सापळा रचून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले. महिलेकडून ४ लाख ३ हजार रुपयांचा २५ किलो ४४०ग्रॅम वजनाचा गांजा, १ लाख १२ हजार ९०० रोख रक्कम आणि एक मोबाईल असा एकूण ५ लाख ३३हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.