महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे दुहेरी हत्याकांड अपडेट: कारमध्ये सापडल्या रक्ताळलेल्या सँडल, नवऱ्यानेच हत्या केल्याचा संशय - pune police news

आलिया शेख आणि आयान शेख या मायलेकाचा खून करून त्यांचे मृतदेह सासवड आणि कात्रज बोगदा परिसरात टाकून देण्यात आले होते.

pune murder case
हत्या झालेली आई आणि मुलगा

By

Published : Jun 16, 2021, 2:59 PM IST

Updated : Jun 17, 2021, 3:23 PM IST

पुणे - पुण्यातील आलिया शेख आणि आयान शेख या मायलेकाचा खून करून त्यांचे मृतदेह सासवड आणि कात्रज बोगदा परिसरात टाकून देण्यात आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, यातील मृत महिलेचा पती अबिद शेख हा बेपत्ता असून त्यानेच खून केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांची सात पथके रवाना झाली आहेत.

विविध ठिकाणी फेकले होते मृतदेह-

मंगळवारी सासवड परिसरातील खळद गावाजवळ आलिया शेख तर पुण्यातील नवीन कात्रज बोगद्याजवळ आयान शेख याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता त्यांना सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर ब्रिझा कार सापडली होती. बेपत्ता असलेल्या आबिद शेख याने 11 जून रोजी ही कार भाड्याने घेतली होती. ही कार घेऊन तो आलिया आणि आयान यांच्यासह पिकनिकला गेला होता. सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी पार्क करून पायी चालत निघून गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेख कुटुंबिय मूळचे मध्यप्रदेशातील भोपाळ येथील आहेत. पुण्याच्या धानोरी परिसरात ते राहत होते. आबिद शेख हा एका नामांकित इन्शुरन्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. सोमवारी पहाटे पुणे सातारा रस्त्यावर गाडी पार्क केल्यानंतर तो स्वारगेटच्या दिशेने पायी चालत जाताना दिसत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा शोध लागल्यानंतर या संपुर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सातारा रस्त्यावर सापडलेल्या कारच्या दरवाज्यावर रक्ताचे सडे आहेत. कारमध्ये रक्ताळलेल्या अवस्थेत लहान मुलांच्या सँडल सापडल्या आहेत. याशिवाय खाण्याच्या वस्तू, फळे विखुरलेली आहेत. फॉरेन्सिक टीमने आज सकाळीच या गाडीतून तपासासाठी काही रक्ताचे नमुने हस्तगत केले आहेत. पुणे पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Last Updated : Jun 17, 2021, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details