पुणे -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची ( Malegaon Bomb Blast ) चौकशी एनआयएकडे आहे. साक्षीदार विरोधी होत असल्याने सरकार चिंतेत आहे. या बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आम्ही आमचा वकील देण्याचा विचार केला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Walase Patil On Malegaon Bomb Blast ) यांनी व्यक्त केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ( Malegaon Bomb Blast ) आतापर्यंत 220 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यातील 15 साक्षीदारांनी त्यांची साक्ष बदलली आहे. याबाबत पुण्यात प्रसारमाध्यमांना बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "एनआयएकडे ही चौकशी आहे आणि त्यावर लक्ष ठेवले जात आहे. साक्षीदार विरोधी होत असल्याने महाराष्ट्र सरकार देखील चिंतेत आहे. सरकारची अपेक्षा आहे की पीडितांना न्याय मिळाले पाहिजे. त्यामुळे आम्ही आमचा वकील देण्याचा विचार केला आहे," असे त्यांनी म्हटले आहे.