पुणे - सणसवाडी परिसरातील डोंगर माथ्यावर पती-पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीनेच पत्नीची हत्या केली असून स्वत: गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली आहे.
पत्नीची हत्या करुन पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या - shikrapur police station
औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या सणसवाडीमध्ये हे कुटुंब राहत होते. या सर्व प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचे कारण अद्यापही अस्पष्ट असून शिक्रापूर पोलीस तपास करत आहेत.
शिक्रापूर पोलीस स्टेशन
औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असलेल्या सणसवाडीमध्ये हे कुटुंब राहत होते. या सर्व प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
दरम्यान, या आठवड्यामध्ये शिक्रापूर परिसरात पाच मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, अशा घटनांकडे पोलीसांनी गांभीर्याने पहाण्याची गरज असल्याची गरज नागरिकांमधून होत आहे.