महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नरेंद्र मोदींचे विश्वासू तरीही प्रकाश जावडेकरांना का द्यावा लागला राजीनामा ? - Modi cabinet expansion

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी असलेले प्रकाश जावडेकर यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही राजीनामा द्यावा लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जावडेकर यांचे नेमके कुठे चुकले, ज्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अशी जोरदार चर्चा देखील सुरू आहे.

Prakash Javadekar
प्रकाश जावडेकर

By

Published : Jul 8, 2021, 9:10 AM IST

पुणे -केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांचे राजीनामेही घेतले आहेत. मोदींचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी असलेले प्रकाश जावडेकर यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही राजीनामा द्यावा लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जावडेकर यांचे नेमके कुठे चुकले, ज्यामुळे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला अशी जोरदार चर्चा देखील सुरू आहे.

जावडेकरांना संघटनात्मक जबाबदारी देण्यात येणार असावी. त्यामुळेच त्यांचा राजीनामा घेतला असावा, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रकाश जावडेकर यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. त्यामुळे तरुण वयातच प्रकाश जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. त्यांनी दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1990 ते 2002 या काळात ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होते.

देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर कायम पक्षश्रेष्ठींचा मर्जीत राहिलेल्या आणि वेळोवेळी केंद्र सरकारची बाजू भक्कम मांडणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

पुणेकर असलेले प्रकाश जावडेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. 2016 साली जेव्हा भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले. त्यानंतर स्थापन झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये जावडेकर यांची माहिती प्रसारण संसदीय, कामकाज व पर्यावरण या खात्यांवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये ही प्रकाश जावडेकर यांच्याकडे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि भाजपचा प्रवक्ता अशी दुहेरी जबाबदारी दिली होती.

हेही वाचा -केंद्रीय मंत्रिमंडळ खाते वाटप; जाणून घ्या, नवीन मंत्र्यांकडे कोणते सोपविले मंत्रालय

ABOUT THE AUTHOR

...view details