पुणेमहाराष्ट्रातून वेदांता- फॉक्सकॉन (vedanta foxconn project) एक प्रकल्प गेला म्हणुन आरडाओरडा करणाऱ्या विरोधकांनी केंद्राचे चार मोठे प्रकल्प राज्यात का येऊ दिले नाहीत? असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (finance minister nirmala sitharaman) यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या औद्योगिक नुकसानास (Industrial loss of Maharashtra) जबाबदार आहे. अस त्या म्हणाल्या. निर्मला सीतारामण पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पावर बोट ठेवलं.
नाणार प्रकल्प कोणी थांबवला?नाणार सारखा (Nanar Project) प्रकल्प जी आशियामध्ये सर्वात मोठी ऑईल रिफायनरी होणार होती. त्याला कोणी थांबवलं. तसेच आरे मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्पाला कोणी थांबवलं. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कोणी थांबवला. या प्रकल्पाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाईल, म्हणून हे प्रकल्प थांबवण्यात आले.