महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भारतीय विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला का आहे पसंती! जाणून घ्या 'या' स्पेशल रिपोर्टमधून - युक्रेनमधील मेडिकल शिक्षण

युक्रेनमध्ये मेडिकल म्हणजेच एमबीबीसी ( Indian Student in Ukraine ) करणारे विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात तेथे गेल्याचे आपल्याला दिसून ( Indian Students going Abroad for study ) येते. त्यामुळे जाणून घेऊया, भारतीय विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला नेमकी पसंती का ( Why Indian students prefer Ukraine for Medical Study ) देतात.

Why Indian students prefer Ukraine
वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला का आहे पसंती

By

Published : Mar 3, 2022, 5:19 PM IST

Updated : Mar 3, 2022, 5:37 PM IST

पुणे - मागील सात दिवसांपासून रशिया युक्रेन युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू आहे. ते काही थांबायचे नाव घेत नाही. या युद्धामुळे अनेकजण युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. भारतातील देखील अनेक विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारत सरकार हे विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. आज ही अनेक विद्यार्थी आपल्या मायदेशी परतले आहेत. पण आजही अनेकजण तिथेचं अडकून असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. यासर्वांमध्येयुक्रेनमध्ये मेडिकल म्हणजेच एमबीबीसी ( Indian Student in Ukraine ) करणारे विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात तेथे गेल्याचे आपल्याला दिसून ( Indian Students going Abroad for study ) येते. त्यामुळे जाणून घेऊया, भारतीय विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला नेमकी पसंती का ( Why Indian students prefer Ukraine for Medical Study ) देतात.

प्रतिक्रिया

युक्रेनमध्ये वर्षाला जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी जातात शिक्षणासाठी -

केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना युक्रेनमधुन भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑपरेशन गंगा या मोहिमेत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. पण हे सगळे सुरू असतानाच भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनला पसंती का देतात? हा प्रश्न समोर येत आहे. युक्रेनमध्ये वर्षाला जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घ्यायला जातात. पण यामागे नेमकं कारण काय आहे हाच प्रश्न सर्वांना पडतो आहे.

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनची निवड का? ही आहेत मुख्य कारणे

युक्रेन मधल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करत असताना एक गोष्ट समोर आली की, भारतीय मुले विदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जात असल्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या देशात असलेली सरकारी महाविद्यालयांची अपुरी संख्या आहे. त्याचबरोबर भारतात वैद्यकीय शिक्षणासाठी अमाप खर्च देखील लागतो. तुलनेने हाच खर्च युक्रेनमध्ये खूप कमी प्रमाणात होतो. हे देखील एक मुख्य कारण आहे. जिथे भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला पसंती देतात. तसेच यूक्रेनमध्ये सुमारे दहा हजार वैद्यकीय जागांसाठी वर्षातून दोनवेळा प्रवेश मिळतो. पहिला सप्टेंबर आणि दुसरा जानेवारी महिन्यात. त्यामुळे तिथे प्रवेश मिळवणे सोयीचे होते.

हेही वाचा -MLA Sanjay Daund Sheershasan : विधिमंडळासमोर राज्यपालांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आमदाराचे शीर्षासन, पाहा VIDEO

Last Updated : Mar 3, 2022, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details