पुणे -पुण्यातील एफसी कॉलेज रोडवर हॉटेल सुरू झाले आहे. तस पाहिले तर असे हॉटेल सर्वत्रच सुरू होतात. त्यामध्ये नाविन्य काही नाही. मात्र, हे जे हॉटेल सुरू झाले आहे ते सामान्य हॉटेल्सपेक्षा काही वेगळे आहे. (Deaf Children Run Hotels Terrasinne) व्यंगामुळे आत्मविश्वास गमावून बसलेली अशी मुले कुचेष्टेच्या भीतीने सामान्यजनांपासून चार हात दूर राहाणे पसंत करतात. मात्र, त्या मुलांना येथे सन्मान देण्याचे काम केले आहे. या हॉटेलमध्ये काम करतात ते फक्त मूकबधीर मुलचं काम करतात.
हॉटेलमध्ये येणारांची गर्दी जास्त आहे
यातील सर्व मुलं बोलू आणि ऐकू शकत नाहीत. मात्र, शारिरीकदृष्ट्या व्यवस्थित असणाऱ्या मुलांसारखे काम करत आहेत. इतर हॉटेलपेक्षा या हॉटेलमध्ये येणारांची गर्दी जास्त आहे. (Deaf Children Run Hotels In Pune) येथे येणारे लोक कुतुहलाने येत आहेत. या मुलांशी संवाद करताना सर्वजन आपुलकीने संवाद साधत आहेत. त्यांना ऑर्डर देतानाही ग्राहक त्यांना समजेल अशा भाषेत बोलत आहेत.