पुणे: कोरोना प्रतिबंधक लसीचे अनेक प्रकार आहेत आत्ता एमआरएनए या नवीन तंत्रज्ञानाने ज्या लसी तयार केल्या आहेत. या मुख्यत्व अमेरिकेतील आहेत. फायझर आणि मॉडेरना कंपनीच्या या लसी असून संपूर्ण जगात या आदर्श आणि परिणामकारक मानल्या जात आहेत.
HGCO 19 vaccine : तिसरा डोस देण्याची वेळ आली तर एचजीकॉ 19 लसीला प्राधान्य मिळू शकेल - डाॅ. भोंडवे
देशात जर तिसरा डोस (The third dose) देण्याची वेळ आलीच तर एचजीकॉ 19 या लसीला (HGCO 19 vaccine) प्राधान्य मिळू शकेल पुण्यातील जिनोव्हा फार्मसिटी कंपनीने (Genoa Pharmacy Company) ही लस तयार केली असून तिच्या पाहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहे. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondwe) यांनी दिली आहे.
पुण्यातील जिनोव्हा फार्मसिटी कंपनीने एचजीकॉ 19 ही लस तयार केली असून तिच्या पाहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहे. 22 डिसेंबरला या चाचण्या पूर्ण होणार आहेत.आत्ता पर्यंत केलेल्या चाचण्यानंतर जे निकष आले. ते अतिशय उत्साहपूर्ण आहेत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एमआरएनए लस ही आपल्या देशातील कोव्हीशिल्ड आणि कोव्हाक्सींन यांच्याबरोबर दिल्यावर "मिक्स मॅन मॅच" या पद्धतीने उपयुक्त ठरू शकते.देशात जर तिसरा डोस देण्याची वेळ आली तर निश्चितच या लसीला प्राधान्य मिळू शकेल असे मत डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. या लसीने कुठल्याही प्रकारचे मोठे दुष्परिणाम होत नाहीत. जे दुष्परिणाम आहेत ते अत्यंत सौम्य आहेत. याची मोठी ट्रायल होईल तेव्हा त्याबाबत अधिक माहिती मिळेल.परंतु एचजीकॉ 19 या भारतीय बनावटीच्या लसीने भारतीय तंत्रज्ञान भारतीय शस्त्रज्ञ हे जगात किती उच्च पातळीचे आहे.हे ही लक्षात येते आणि त्याच बरोबर भारतातील लसीचा तुटवडा या लसीपासून कमी होईल.आणि निश्चितच ते उपयुक्त ठरतील.असेही भोंडवे यांनी म्हणले आहे.