पुणे - एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar suicide) या तरुणाने 29 जूनला आत्महत्या केली. स्वप्नीलने नैराश्यातून आत्महत्या केली होती. या घटनेला आता 6 महिने उलटल्यानंतर (Maharashtra Public Service Commission) एमपीएससीच्या मुलाखतीच्या यादीत स्वप्नीलचे नाव आले आहे. हे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (2019)च्या मुलाखतीसाठीच्या यादीत त्याचे नाव आले आहे. (Maharashtra Engineering Service Examination 2021) आता स्वप्निलचा जिव गेल्यानंतर या नाव येण्याचा या उपयोग अशी प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच, विद्यार्थ्यांचा जी घेतल्यानंतर एमपीएससीला जा आली काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आत्ता काय फायदा?
परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत होत नसल्याने व नोकरी मिळत नसल्याने स्वप्नीलने आत्महत्या केली होती. (MPSC Exam 2021) ज्या कारणासाठी त्याने आत्महत्या केली त्या मुलाखतीच्या यादीत त्याचे नाव आले खरे मात्र मुलाखतीला जाण्यासाठी स्वप्नील नसणार! त्यामुळे ज्या मेहनतीने त्याने या स्पर्धा परीक्षांची तयारी केली, परीक्षा उत्तीर्णही झाला. (Maharashtra Engineering Service Examination) मात्र, मुलाखत होत नसल्याने व नोकरी नसल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नीलचे मुलाखत यादीत नाव येऊनही त्याला व त्याच्या कुटुंबियांना काय फायदा झाला? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं?
एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेले कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. (Maharashtra Public Service Commission Examination 2021) पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आले आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा. असं स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.