महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिंहगडाचा पश्चिमकडा सर करुन ३५० युवक-युवतींनी दिली नरवीराला मानवंदना - 350 climbers climbed sinhgad fort

नरवीर तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या पराक्रमाला तरुणाईने प्रत्यक्ष गडावर जाऊन आगळीवेगळी मानवंदना दिली. यावेळी जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोषात ३५० युवक-युवतींनी सिंहगडचा पश्चिम कडा सर केला.

western-side-of-sinhgad-fort-the-cliff-climbed-by-350-climbers
सिंहगडाचा पश्चिमकडा सर करुन ३५० युवक-युवतींनी दिली नरसिंहाला मानवंदना

By

Published : Feb 17, 2020, 8:17 AM IST

पुणे - रणांगणावर रक्त सांडले, रणी धुरंदर वीर स्मरा... दुर्गम गड गाजविला रात्री, नरवीर केसरी घ्या मुजरा... अशा काव्यपक्तींमधून आणि जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात ३५० युवक-युवतींनी सिंहगडाचा पश्चिम कडा सर करत जणू पुन्हा एकदा सिंहगडावर चढाई केली. मराठयांच्या इतिहासातील एक देदिप्यमान पर्व असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या पराक्रमाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रत्यक्ष गडावर जाऊन आगळीवेगळी मानवंदना दिली. मावळ्यांच्या पोशाखातील तरुणाईने सुमारे ४० फुटी कडा दोराच्या सहाय्याने चढत मराठयांच्या शौर्याचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवला.

सिंहगडाचा पश्चिमकडा सर करुन ३५० युवक-युवतींनी दिली नरसिंहाला मानवंदना

इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त आणि सिंहगड सर केल्याच्या घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ३५० युवक-युवतींनी सिंहगडाचा पश्चिम कडा दोरावरुन सर करत तानाजी मालुसरेंना आगळीवेगळी मानवंदना दिली. या गडावर झालेल्या कार्यक्रमाला सर्जिकल स्ट्राईकचे रणनीतीकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी तानाजी मालुसरे यांच्या युद्धकथेवरील गौरी शेटे यांनी विविध कवितांचे एकत्रिकरण केलेल्या नरसिंहाचे गौरवगान या विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. एक्सप्लोरर्स या नामवंत ट्रेकींग ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दिवसभर सुरु होता.

ABOUT THE AUTHOR

...view details