महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात 1 मे पर्यंत विकेंड लॉकडाऊन, विनाकारण बाहेर फिरल्यास होणार कारवाई - pune corona update

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक संचारबंदी राज्य सरकारच्यावतीने लागू करण्यात आली आहे. या कडक संचारबंदीसह विकेंड लॉकडाऊन देखील असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 मे पर्यंत जाहीर केलेल्या कडक संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर नियमावलीत दिलेल्या लोकांनाच बाहेर फिरता येणार आहे.

पुण्यात 1 मे पर्यंत विकेंड लॉकडाऊन, विनाकारण बाहेर फिरल्यास होणार कारवाई

By

Published : Apr 17, 2021, 4:16 PM IST

पुणे - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 मे पर्यंत कडक संचारबंदी राज्य सरकारच्यावतीने लागू करण्यात आली आहे. या कडक संचारबंदीसह विकेंड लॉकडाऊन देखील असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 मे पर्यंत जाहीर केलेल्या कडक संचारबंदीत फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर नियमावलीत दिलेल्या लोकांनाच बाहेर फिरता येणार आहे.

विकेंड लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच बाहेर फिरता येणार आहे. पण काही लोक अजूनही संभ्रमात असून त्यांना अस वाटतंय की शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊन नसून फक्त कडक संचारबंदी आहे.

पुणे शहरात 1 में पर्यंत विकेंड लॉकडाऊन असणार आहे. यात जर कोणीही विनाकारण बाहेर फिरलं तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिली. दोन विकेंड लॉकडाऊनला पुणेकरांनी उत्स्फुर्त असा सहभाग दर्शविला आहे. पण आत्ता नागरिक संभ्रमात असल्याने बाहेर पडत आहेत. एकूणच विकेंड लॉकडाऊनला पुण्यात असलेला पोलीस बंदोबस्त आणि करण्यात येणारी कारवाईबाबत सहायक पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्याशी बातचीत केली आहे.

पुण्यात 1 मे पर्यंत विकेंड लॉकडाऊन, विनाकारण बाहेर फिरल्यास होणार कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details