पुणे - राज्यासह पुणे जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू ( Heavy Rain In Pune ) आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला ( Warning of heavy rains in Pune ) आहे. पुणे जिल्हा प्रशसनाच्यावतीने जिल्ह्यातील जी धोकादायक गावे, वस्ती आहेत. अश्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य खबरदारी घेतली आहे. लोकांना रस्ते, आरोग्य, अन्नधान्य, वीज या सर्व सुविधा तसेच गावांमध्ये वॉकी टॉकी देण्यात आले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासन सज्ज - हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनंतर जिल्ह्यात माळीन सारखी कोणतीही घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील ज्या ज्या गावात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या गावांमध्ये सर्वेक्षण करून त्या त्या वस्तीतील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर काही गावांमध्ये रस्ते, अन्नधान्य, औषध उपचार तसेच संपर्क तुटू नये म्हणून वॉकी टॉकी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जर पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये जरी अतिवृष्टी झाली तरी या परिस्थितीत जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे देखील यावेळी आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले.