महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट - हवामान विभाग

Maharashtra Rain Update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update

By

Published : Jul 14, 2022, 6:59 AM IST

Updated : Jul 14, 2022, 11:08 AM IST

पुणे - राज्यामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ( Maharashtra Rain Update ) या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना अलर्ट ?रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे, ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली देण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता असून, त्यानंतरच्या 3 दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे. तर मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकरी वर्गाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

Maharashtra Rain Update

या ठिकाणच्या शाळा बंद -राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे चित्र आहे. पुढील 2 दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

येथील धरणं, तलाव मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो -आज मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत, तर काही ठिकाणी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा वाढल्याने नक्कीच दिलासादायक गोष्ट म्हणावी लागणार आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

हेही वाचा -Red Alert In Pune : पुण्यात ४८ तासात अतिवृष्टीची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Last Updated : Jul 14, 2022, 11:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details