महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे खेडशिवापूर येथे गोदामाला मोठी आग - Warehouse fire in Pune

पुण्यात खेडशिवापूर येथील गोदामाला मोठी आग लागली आहे. या गोदामात कापूस आणि कापड मोठ्या प्रमाणात होते.

पुणे खेडशिवापुर येथे गोदामाला आग

By

Published : Oct 7, 2019, 3:34 PM IST

पुणे :सातारा-पुणे महामार्गावरील वेळू गावातील गादी कारखान्याला सोमवारी दुपारी मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग विझवण्यासाठी आग्निशमन दल प्रयत्न करत आहे.

पुणे खेडशिवापूर येथे गोदामाला आग

या गोदामात मोठ्या प्रमाणात कापूस आणि कापड असल्याने आग अधिकच भडकली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावकरी आणि अग्निशामक दल यांच्याकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details