पुणे - शहरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग सध्या मंदावला असल्याने पुणेकर नागरिक आणि प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एप्रिल-मे मध्ये दर दिवशी 5 ते 6 हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुणे शहरात आढळत होते. हा आकडा गेल्या 15 दिवसात कमी होत गेला आणि गेल्या आठवड्यापासून हा आकडा हजाराच्या आत आला असून रविवारी नवीन रुग्ण संख्या 709 इतकी होती.
पुण्यात अंत्यसंस्कारासाठीचे वेटींग थांबले, कोरोना मृत्यू दर घटल्याचे चित्र - पुण्यात कोरोना मृत्यूदरात घट
शहरात कोरोनाच्या संसर्गाचा वेग सध्या मंदावला असल्याने पुणेकर नागरिक आणि प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. या काळात शंभरच्यावर मृत्यू हे शहरात होत होते. आता मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा 60 च्या घरात आला आहे.
शनिवारी 973, शुक्रवारी 931, गुरुवारी 1164 इतकी होती. त्यामुळे दिलासा देणारे चित्र शहरात असून मृत्यूचा आकडाही कमी झाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. या काळात शंभरच्यावर मृत्यू हे शहरात होत होते. आता मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा 60 च्या घरात आला आहे. शहरात गेल्या काही दिवसात सरासरी 60 ते 65 च्या दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होत असून हा आकडा आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत.
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने शहरातील स्मशानभूमीवर देखील ताण आला होता. कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णासाठी असलेल्या कैलास स्मशानभूमीमध्ये दररोज 30 ते 35 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते आणि हा आकडा वाढत जाऊन एकाच दिवसात 45 ते 50 मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले होते. अंत्यसंस्करासाठी मृतदेह वेटींगवर असल्याचे विदारक चित्र कैलास स्मशानभूमी, वैकुंठ स्मशानभूमीमध्ये दिसून आले होते. ही परिस्थिती आता बदलली असून मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी वेटींग पहायला मिळत नाही. सध्या कैलास स्मशानभूमीमध्ये सरासरी 8 ते 10 कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. वैकुंठ स्मशानभूमीसह इतरही स्मशानभूमीवर देखील कोरोना मृतदेहावर होणारे अंत्यसंस्कार घटले आहेत. एप्रिल मे दरम्यान कोरोना मृतदेह वाढल्याने विद्युतवाहिनी सोबतच, लाकडांच्या सहाय्याने अंत्यसंस्कार मोठ्या प्रमाणात केले जात होते आता मात्र बहुतांश अंत्यसंस्कार विद्युत दाहिनीवर होत आहेत.