पुणे - कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या आज चौकशीसाठी चौकशी आयोगासमोर हजर झाल्या होत्या. तब्बल सहा तासांहून अधिक शुक्ला यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणात आयोग आता तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
- पुढील कामकाज मुंबई येथे 21 ते 25 फेब्रुवारीला सुरू होणार-
कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची घटना घडली त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक होते. या प्रकरणात चौकशीसाठी त्यांनाही बोलावण्यात यावे असा अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी आयोगापुढे सादर केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या पुराव्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे या संदर्भातील आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत, असे देखील यावेळी वकील हिरे यांनी सांगितले आहे. आयोगाचे पुढील कामकाज मुंबई येथे 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान सुरू होणार आहे. चौकशीत रश्मी शुक्ला यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली असल्याचेही वकिलांनी सांगितले.
- परमबीर सिंग यांनाही समन्स बजावण्यात आला होता -