महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विनोद म्हात्रे यांचे नगरसेवक पद धोक्यात; सभापती निवडणुकीत गैरहजर - Vinod Mhatre

मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या नगरसेवक विनोद म्हात्रे यांना भाजपकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. प्रभाग समिती पदाच्या निवडणुकीत अघोषित बहिष्कार टाकणाऱ्या नगरसेवक विनोद म्हात्रे यांना चोवीस तासात खुलासा द्यावा असे नोटीस मध्ये म्हटले आहे.

विनोद म्हात्रे
विनोद म्हात्रे

By

Published : Oct 24, 2021, 6:34 AM IST

मीरा भाईंदर - मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती सभापती निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या नगरसेवक विनोद म्हात्रे यांना भाजपकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. प्रभाग समिती पदाच्या निवडणुकीत अघोषित बहिष्कार टाकणाऱ्या नगरसेवक विनोद म्हात्रे यांना चोवीस तासात खुलासा द्यावा असे नोटीस मध्ये म्हटले आहे.

20 ऑक्टोबर रोजी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सहा प्रभागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपाच्या वतीने प्रभाग क्र.एक मधून भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे यांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले होते. निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना नयना म्हात्रे यांच्या समवेत विनोद म्हात्रे स्वत: हजर होते. परंतु ऑनलाईन मतदानाच्या वेळी विनोद म्हात्रे यांनी मतदान केले नाही. नगरसेवक विनोद म्हात्रे गैरहजर राहिल्या प्रकरणाची भाजपाचे गटनेते हसमुख गहलोत यांनी गंभीर दखल घेऊन पक्षाचा व्हिप डावलल्याप्रकरणी नगरसेवक विनोद म्हात्रे यांना येत्या चोवीस तासांत याबाबतचा स्पष्ट खुलासा करण्यात यावा, अन्यथा त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्यात येईल, अशी नोटीस बजाविलेली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी नगरसेवक विनोद म्हात्रे यांना संपर्क केला असता फोन उचलण्यास नकार दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details