महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लवकरच राजकीय पक्षात प्रवेश करणार - तृप्ती देसाई - महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई

महिला सबलीकरण तसेच स्त्री पुरुष समानता यासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.

महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.

By

Published : Aug 28, 2019, 1:55 PM IST

पुणे - आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्याच्या अनेक भागात नेतेमंडळी पक्ष प्रवेश करत आहेत. विविध प्रमुख पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही विधानसभेच्या निमित्ताने स्वत:ची शक्ती अजमावताना दिसत आहेत.

महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.

महिला सबलीकरण तसेच स्त्री पुरुष समानता यासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई स्वत:चे राजकीय भवितव्य अजमावून पाहात आहेत. लवकरच आपण एका राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.

हेही वाचा : सरकार पूरग्रस्तांना भीक देतेय का? भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई सरकारवर कडाडल्या

सामाजिक काम करताना राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा देसाई यांनी बोलून दाखवली आहे. शनिशिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेशासाठी केलेला लढा असेल, किंवा शबरीमला मंदिरातल्या महिला प्रवेशाचा मुद्दा असेल, वेळोवेळी तृप्ती देसाई यांनी महिलांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातही त्यांना प्रसिद्धी मिळाली.

कोणत्या पक्षात जावे, कशा पद्धतीने प्रवेश घ्यावा, यांसारखे प्रश्न त्यांनी जनतेच्या दरबारात मांडून समाज माध्यमांवर प्रतिक्रिया मागवल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details