पुणे -आज जे जुगाड करून सरकारमध्ये बसले आहे त्यांचे वचननामे काढून बघा. त्यांनी म्हटले आहे, की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करू. तरीही आज गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचारी (ST Employee strike)हे आझाद मैदाना(Azad Maidan)वर आंदोलनकरत आहेत. मात्र सरकार निर्णय घेत नाही. लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघितला जात आहे. हे सरकार गोरगरिबांचे नाही. हे सरकार उपेक्षितांचे नाही. तर हे सरकार यांच्याच मंत्र्यांचे आहे. रोज सकाळी येतात आणि सांगतात, की आमच्या सरकारला धोका नाही. हे सरकार एकच विषयावर गंभीर आहे, ते म्हणजे आमचे सरकार खंबीर आहे, अशी टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh, Vice President BJP Maharashtra)यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार(Maha Vikas Aghadi)च्या फसवणुकीच्या दोन वर्षांच्या पूर्ततेवर भाजपा(Maharashtra BJP)ची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
'नक्की किती फास्टट्रॅक कोर्ट सुरू आहेत?'