पुणे- कोरोनाच्या काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णालयात जेव्हा पीपीई किट घालून 12 -12 तास काम करावे लागते, तेव्हा या डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्वाधिक त्रास म्हणजे पीपीई किट घालून काम करत असताना मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि या घामामुळे या डॉक्टरांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मात्र आत्ता या पीपीई किट घालून येणाऱ्या घामावर पुण्यातील 19 वर्षीय इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने कोव्ह- टेक व्हेंटिलेटर सिस्टम बनविले आहे. या सिस्टमद्वारे पीपीई किट घालून काम करताना घाम येणार नसल्याचा दावा त्याने केला आहे. निहाल सिंग आदर्श असे त्याचे नाव आहे.
पीपीई किटमधील घामापासून सुटका अशी सुचली कल्पना-पुण्यात राहणाऱ्या निहालची आई डॉक्टर असल्याने डॉक्टर परिचारिका वैद्यकीय कर्मचारी यांना पीपीई किट मध्ये काय त्रास होतो, घामामुळे बुरशीजन्य आजारांचा धोका कसा संभवतो याची त्यांना कल्पना होती. निहाल फर्स्ट इयरमध्ये असताना त्याला कोविड रिलेटेड एक प्रोजेक्ट करायचे होते. त्याने त्याच्या आईला कोविडमध्ये काम करत असताना काय त्रास होतो, याबाबत माहिती घेतली असता, त्याला पीपीई किटमुळे होणाऱ्या त्रासाबाबत आईने माहिती दिली. या माहितीच्या आधारावर निहालने अभ्यास करून यावर उपाय शोधून काढला. त्याने सुरुवातीला व्हेंटिलटरची संकल्पना कागदावर रेखाटली आणि त्याचा एक डायग्राम कागदावर रेखाटला. त्यानंतर महाविद्यालयातील मित्रांच्या मदतीने त्याने व्हेंटिलेटर सिस्टम किट बनवायला सुरुवात केली.
पीपीई किट वापरणाऱ्या डॉक्टरांना दिलासा कोव्ह-टेक व्हेंटिलेटर सिस्टम नावाचे बनवले किट
मुंबईच्या इलेक्टॉनिक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी निहाल सिंग आदर्शने त्याच्या 'वॅट टेक्नोव्हेशन स्टार्टअप'द्वारे हा उपक्रम हाती घेतला. कोव्ह टेक व्हेंटिलेशन सिस्टम हे उपकरण पारंपरिक पीपीई किटच्या आतमध्ये कमरेवर साध्या पट्ट्याप्रमाणेच घट्ट बांधता येते. हे उपकरण चार्ज करता येत असून त्याला असलेल्या एका बटनाच्या साहाय्याने त्यातील पंख्याचा वेग कमी जास्त नियंत्रित करता येतो. या व्हेटिलेशन सिस्टममुळे पीपीई किटमध्ये हवा खेळती राहते. तसेच पीपीईकिटमुळे संसर्गाचा प्रादूर्भावही टाळला जातो. पुण्याच्या काही डॉक्टरांकडून याचा वापर सुरू करण्यात आल्याची माहिती यावेळी निहाल सिंग आदर्श याने दिली.
पीपीई किट वापरणाऱ्या डॉक्टरांना दिलासा उत्पादन निर्मितीसाठी अनुदान-
सोमैया विद्याविहार विद्यापीठात त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साह्याने आरआयआयडीएल येथे हे 'कोव्ह टेक व्हेंटिलेशन सिस्टम' नावाचे तंत्रज्ञान विकसित केले. के जे सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याला एमआयडीएचआयच्या प्रमोटिंग अँड एक्सेलेरेटिंग यंग अँड एसपायरिंग टेक्नॉलॉजीच्या उत्पादनासाठी 10 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
देशातील विविध राज्यात मागवले जातोय किट
निहालने बनविलेले किटच पुण्यात नव्हे तर देशातील विविध शहरातून याकिट बाबत मागणी होत आहे. यात सार्वजनिक संस्था संघटनांच्यावतीने देखील मागणी होत आहे. तसेच काही लोक तर आपले नातेवाईक तसेच आई-वडील डॉक्टरांसाठी गिफ्ट देण्यासाठीपण हे खरेदी करत आहे.
निहालचे कोव्ह-टेक व्हेटिलेशन माझ्या मुलाचा खूप अभिमाननिहाने एकोणविसाव्या वर्षी अशा पद्धतीचा किट बनवून खूप मोठं काम केल आहे. त्यात त्याने बनविलेल्या किटचा वापर सर्वप्रथम माझ्याकडून झाल्याने याचा माला खूप जास्त आनंद झाला. या किटमुळे पीपीई किट घालून काम करताना घाम येण्याच्या त्रासातून सुटका झाली आहे. एक आई म्हणून त्याच्या या कामगिरीच मला खूप अभिमान आहे, अशी भावना निहालच्या आईने यावेळी व्यक्त केली.
पुण्याच्या निहालचे कोव्ह-टेक व्हेटिलेशन ठरतेय प्रभावी