महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vehicle thefts hike in Pune : पुणे शहरातून वर्षभरात तब्बल 1200 वाहनांची चोरी - pune crime news

पुण्यात वाहन चोरीच्या घटना वाढल्या (Vehicle thefts hike in Pune) आहेत. या वर्षभरामध्ये शहराच्या विविध ठिकाणाहून तब्बल बाराशे वाहनं चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. वाहन चोरीचे पुण्यात 67 हॉटस्पॉट आहेत.

Vehicles thefts hike
चोरी गेलेली वाहनं

By

Published : Dec 2, 2021, 7:18 PM IST

पुणे - शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली (Vehicle thefts hike in Pune) आहे. या वर्षभरामध्ये शहराच्या विविध ठिकाणाहून तब्बल बाराशे वाहनं चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. तर गेल्यावर्षी हा आकडा हजारांच्या घरात होता. यामुळे वाढत्या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली असून विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

  • वाहन चोरीचे 67 हॉटस्पॉट -

गेल्या काही वर्षात काही विशिष्ट ठिकाणाहून वारंवार वाहन चोरीच्या घटना घडल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा चार पेक्षा अधिक वेळा ज्या ठिकाणाहून वाहन चोरीस गेल्याची घटना घडली आहे असे 67 हॉटस्पॉट पोलिसांनी आयडेंटिफाय केले आहेत. वाहनचोरी रोखण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार, चोरीला जाण्याची वेळ, कारणे, परिमंडळनिहाय चोरीला जाण्याची ठिकाणे आदींची माहिती काढली आहे.

  • या वेळात सर्वाधिक चोऱ्या -

यंदा शहरात जानेवारीपासून आजवर एकूण १ हजार १८६ वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत, तर गतवर्षी ९७५ वाहन चोरीच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरासमोर पार्किंगसाठी जागा नसल्याने ही वाहने रस्त्यावर लावतात. याचाच गैरफायदा चोरटे घेतात. सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्या हेरून वाहने चोरली जातात. बहुतांश वाहने सायंकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान चोरी होत असल्याचे, तर सकाळी ६ ते ९ दरम्यान सर्वात कमी वाहने चोरीला गेल्याची नोंद आहे. ८ पेक्षा जास्त वेळा वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एकूण ८३ आरोपींची कुंडली पोलिसांनी काढली आहे.

  • वाहन चोरीच्या घटनांच्या तपासासाठी पोलिसांची पथके-

वाहन चोरीच्या घटनांचा तपास तत्काळ व्हावा आणि अशा घटनांवर आळा बसावा, यादृष्टीने पोलिसांची पथके काम करत आहेत. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले जातील. नागरिकांनीही आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

  • वाहन चोरी रोखण्यासाठी ही काळजी घ्या-

1) सोसायट्यांबाहेर सुरक्षारक्षक नियुक्त करणे

2) दुचाकींचे जुने झालेले लॉक बदलणे

3) सोसायटीमध्ये सीसीटीव्हींचा वापर वाढवणे

4) गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पार्किंगसाठी पुरेशी जागा

ABOUT THE AUTHOR

...view details