महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vasant More : एखाद्या लढाईत सेनापती नसला की लढाई हारत नाही : वसंत मोरे - वसंत मोरे तिरुपतीहून परतले

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे तिरुपती दर्शन करून पुण्यात परत ( Vasant More Returned From Tirupati ) आले. त्यांना भोंग्याच्या आंदोलनात ( MNS Loudspeaker Agitation ) सहभागी झाले नसल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'एखाद्या लढाईत सेनापती नसला की लढाई हारत नाही'.

vasant more
वसंत मोरे

By

Published : May 6, 2022, 12:47 PM IST

पुणे : तिरुपती बालाजीला जायचा कार्यक्रम हा माझा पूर्वनियोजित होता. एखाद्या लढाईला एखादा सरसेनापती नसला की, लढाई हारत नाही. पुणे शहरातील सर्वच मनसैनिक उपस्थित होते. ते या भोंग्यांच्या आंदोलनात सहभागी झाले ( MNS Loudspeaker Agitation ) होते, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी जेव्हापासून मशिदीवरील भोंगे काढा ही भूमिका घेतली आहे तेव्हापासून पुण्याचे माजी शहराध्यक्ष आणि मनसेचे नेते वसंत मोरे हे नाराज असल्याचे दिसून आले. जेव्हा पक्षाने भोंग्यांच्या बाबतीत आंदोलन सुरू केलं तेव्हा वसंत मोरे हे तिरुपती बालाजीला गेले होते. आज ते पुण्यात ( Vasant More Returned From Tirupati ) आले. तेव्हा ते बोलत होते.

वसंत मोरे



माझ्या इथं पहिल्यापासूनच मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी केला :माझ्या भागातील मुस्लिम बांधवांनी पहिल्यापासूनच मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी केला. सकाळची अजान होतंच नाहीये. त्यामुळे माझ्या प्रभागात आरती झाली नाही. विशेष म्हणजे मी उपनगरमध्ये येतो. ईदच्या दुसऱ्या दिवशी आरती आणि हनुमान चालीसा ही शहरात झाली, असं देखील यावेळी मोरे म्हणाले.


मी राज मार्गावर आहे आणि राज मार्गावर राहील :मोरे यांनी काल जे व्हाट्सएप स्टेटस ठेवलं होतं. त्यावर त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझा रस्ता चुकतोय, असं काही नाही. मला स्वामी विवेकानंद यांच स्टेटस खूप आवडत. तुम्ही शेवटच वाक्य घेतल. पण पहिली वाक्य घेतली नाहीत. ज्यावेळेस तुमचा संघर्ष होत असतो, तुमच्या मागे कोणीतरी बोलत, अडचणी येतात, तेव्हा तुम्ही अस समजयाच की योग्य मार्गावर आहात. तुम्ही नेमकं रस्ता बदला हे घेतल, पण मी राज मार्गावर आहे आणि राज मार्गावर राहील, असं देखील यावेळी मनसेचे नेते वसंत मोरे यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा : 'राज ठाकरे जिंदाबाद होते अणि जिंदाबादच राहतील' : वसंत मोरे

ABOUT THE AUTHOR

...view details