पुणे-पुण्यात शुक्रवारी झालेल्या मोर्चात राज ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्याने माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. राज ठाकरे हे माझ्यासाठी जिंदाबाद होते आणि ते माझ्यासाठी जिंदाबादच राहणार आहेत, अशा भावना मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे ( Vasant More praised Raj Thackeray ) यांनी व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यावरून विधान ( Raj Thackerays statement on loudspeaker ) केले होते. त्याच्या विरोधात शुक्रवारी पुण्यात मुस्लिम समाजाने ( Muslim community agitation in Pune ) आंदोलन केले होते. याच आंदोलनात मुस्लिम समाज हा राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसला होता. राज ठाकरे मुर्दाबाद म्हणत यापुढे कुठलाही मुस्लीम मनसेला मतदान करणार नाही, अशी भूमिका काही जणांनी मांडली होती.
काय म्हणाले वसंत मोरे - पाडवा मेळाव्यात राज साहेबांनी जे भाषण केले, त्याबद्दल बोलताना मी सुरुवातीपासूनच सांगितले होते. माझी भूमिका ही एका लोकप्रतिनिधीची भूमिका होती. त्यात माझा प्रभाग शांत असावा एवढीच माझी इच्छा होती. पण मी जे बोललो त्याच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये काही विपर्यास झाला. मी राजसाहेबांच्या भूमिकेला विरोध केला असा सूर उठला. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी कोंढवा परिसरात मुस्लिम बांधवांकडून मोर्चा आयोजीत करण्यात आला होता. त्या मोर्चामध्ये घोषणा ऐकून माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदरशाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात मुस्लीम समाजाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार आंदोन केले होते. यावेळी जमलेल्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणादेखील दिल्या होत्या. राज ठाकरे हे हिंदू - मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा आरोपदेखील आंदोलनकर्त्यानी केला होता.
मुस्लिम समाजात नाराजीचा सूर-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या मेळाव्यातील आपल्या भाषणात मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा आम्ही हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. अनेकजण राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. तर त्यांच्या विरोधात मुस्लिम समाजदेखील आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.