पुणे -केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज संपूर्ण भारतात विविध राजकीय पक्ष संघटनांकडून भारत बंदची घोषणा करण्यात आली.
भारत बंद : विविध पक्ष, संघटनांकडून पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या - farmers law oppose news
पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. विविध राजकीय पक्ष तसेच कामगार संघटनांकडून भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी हे निदर्शने तसेच आंदोलन करण्यात आले.
![भारत बंद : विविध पक्ष, संघटनांकडून पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठिय्या pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9805908-thumbnail-3x2-pune.jpg)
मोदींविरोधात घोषणाबाजी
पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात या कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली. विविध राजकीय पक्ष तसेच कामगार संघटनांकडून भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी हे निदर्शने तसेच आंदोलन करण्यात आले. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या राजकीय पक्षांसह विविध कामगार संघटना कम्युनिस्ट पक्षाच्या संघटना सहभागी झाल्या. अलका टॉकीज चौकात ठिय्या मांडत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी नितीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी तसेच पोस्टरबाजी करण्यात आली.