महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात रमणबागेच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम - डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शैक्षणिक वर्षाप्रमाणे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. अमृत महोत्सवानिमित्त विविध प्रकल्प आणि विकासकामांसाठी भरीव निधी उभा करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Various activities on the occasion of Ramanbagh's Amrit Mahotsav in Pune
पुण्यात रमणबागेच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

By

Published : Mar 16, 2021, 5:39 PM IST

पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबागच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा अकादमी, विद्यार्थी संशोधन केंद्र, कौशल्य विकास केंद्रासाठी स्वतंत्र इमारत, सौरऊर्जा प्रकल्प, कचर्‍यापासून खतनिर्मिती, औषधी वनस्पतीचे उद्यान, शाळेच्या परिसराचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार असल्याची माहिती डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

पुण्यात रमणबागेच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम
शाळा समितीचे अध्यक्ष अ‌ॅड अशोक पलांडे, प्रभारी मुयाध्यापक दिलीप रावडे, माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देवधर, उपशालाप्रमुख अर्चना पंच, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यावेळी उपस्थित होते.
आदी प्रकल्पांचे काम लवकरच पूर्ण करणार-
अ‌ॅड पलांडे म्हणाले, ‘प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांनी नुकतीच शाळेला ५१ लाख रुपयांची देणगी दिली. या देणगीतून आंतरजाल निर्मिती, संगणक प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण, विज्ञान प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, कनिष्ठ महाविद्यालय नवनिर्मिती प्रकल्प, सृजनशील कलाग्राम, शैक्षणिक साधने निर्मिती केंद्र आदी प्रकल्पांचे काम लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे.
शाळेच्या ७५ वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेत लेखनाचे काम होणार-
मुख्याध्यापक रावडे यांनी शाळेच्या ७५ वर्षाच्या इतिहासाचा आढावा घेतला. शाळेच्या इतिहास लेखनाचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच शाळेचा इतिहास दर्शवणारे दालन सुरू करण्यात येणार असून, माजी विद्यार्थ्यांनी यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन केले आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर, महानाट्य, शोभायात्रा असे ७५ छोटे-मोठे कार्यकम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
हितचिंतकांनी आर्थिक मदत करावी-
‘माजी विद्यार्थी संघाच्या वतीने शैक्षणिक वर्षाप्रमाणे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. अमृत महोत्सवानिमित्त विविध प्रकल्प आणि विकासकामांसाठी भरीव निधी उभा करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details