पुणे -पंजाबमधील अमृतसर लोकसभेचे शिरोमणी अकाली दलाचे खासदार सिमरंजीत सिंह मान याने शहीद भगतसिंग हे क्रांतिकारक नव्हते तर ते आतंकवादी होते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुण्यातील वंदे मातरम संघटना त्यांच्या विरोधात आता आक्रमक झाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात निषेध आंदोलन केले ( Vande Mataram organization protest in Pune ).
वंदेमातरम् संघटनेची मागणी निषेध आंदोलन - पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये वंदे मातरम संघटनेच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आलेला आहे. यावेळी सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू या तिघांच्या प्रतिमेचे पूजन करून खासदार सिमरंजीत सिंह मान यांच्या विरुद्ध घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आलेला आहे.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - शहीद भगतसिंग देशासाठी क्रांतिकारी होते. इंग्रजांविरुद्ध बंड करणे आणि लढा देणे हा जर आतंकवाद असेल तर तो आम्हाला मान्य आहे. महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंग यांचे मार्ग वेगळे असले तरी दोघेही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यामुळे खासदार सिमरनजीत सिंह महान यांनी केलेल्या वक्तव्य हे देशद्रोहाचा गुन्हा आहे, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. यापुढे कुठल्याही राजकारण्याने असे वक्तव्य करू नये नाहीतर होणाऱ्या परिणामांना सर्वस्व ते जबाबदार असतील असा इशाराही याविषयी वंदे मातरम संघटनेच्यावतीने आंदोलनात देण्यात आला.
हेही वाचा -एकनाथ शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव, संपूर्ण शिवसेना काबीज करण्याचा प्रयत्न?