पुणे - वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी कोंढवा येथील महावितारणाच्या शाखा कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. महावितारण कार्यालयाची तोडफोड करणाऱ्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीजग्राहक दिनकर साळवे असं तोफफोड करणाऱ्या ग्राहकाच नाव आहे.
जानेवारीपासून विजबिलाची थकबाकी असल्याने महावितारणाच्या कर्मचाऱ्यांकडून साळवे यांच्या घराची काल वीजपुरवठा खंडित केल्यानंतर साळवे यांनी रागाच्या भरात कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे. विजग्राहक दिनकर साळवे यांच्याकडे वीजबिलापोटी 27 जानेवारीपासून 6 हजार 393 रुपयांची थकबाकी आहे.
वीजपुरवठा महावितरणकडून मंगळवारी सकाळी ११ वाजता खंडित करण्यात आला. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास कोंढवा शाखा कार्यालयात वीजपुरवठा खंडित करता काय म्हणून एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांना शिविगाळ सुरु केली.स्वतःचे नाव जितेंद्र दिनकर साळवी असे सांगत त्याने कार्यालयात तोडफोड केली.
टेबलवरील रजिस्टर फेकून दिले. त्यानंतर वरिष्ठ तंत्रज्ञ निवास आळवेकर यांना ढकलून दिले.याप्रकरणी जितेंद्र दिनकर साळवी विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही - संभाजी राजे