पुणे : लसीकरणासाठीच्या ऑनलाईन प्रणालीत फेरफार करून शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात येऊन लसीकरण करीत असल्याचा आरोप करीत यावर कारवाईची मागणी पुण्यातील मंचर पोलिसांना करण्यात आली आहे. यासंबंधीचे एक निवेदन मंचर पोलिसांना देण्यात आले आहे.
ग्रामीणच्या लसींवर शहरातील नागरिकांचा डल्ला? मंचरमध्ये पोलिसांना निवेदन - आंबेगाव मंचर
शंभर लोकांच्या लसीकरणामध्ये आंबेगाव तालुक्यातील चार ते पाच नागरिकांना लस मिळत असून लसीकरणासाठी पुणे शहरातून नागरिक येत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत सुहास बाणखेले यांनी मंचर पोलिसांना निवेदन दिले आहे. लसीकरणाच्या साईटमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणी सायबर पोलिसांकडून कारवाईची मागणी त्यानी केली आहे.
![ग्रामीणच्या लसींवर शहरातील नागरिकांचा डल्ला? मंचरमध्ये पोलिसांना निवेदन ग्रामीणच्या लसींवर शहरातील नागरिकांचा डल्ला? मंचरमध्ये पोलिसांना निवेदन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11703352-859-11703352-1620620070948.jpg)
ग्रामीणच्या लसींवर शहरी नागरिकांचा डल्ला?
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात लसीकरणासाठी नागरिकांची परवड होतेय. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी वणवण होत असून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय केंद्रामध्ये दररोज 100 नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. मात्र या शंभर लोकांच्या लसीकरणामध्ये आंबेगाव तालुक्यातील चार ते पाच नागरिकांना लस मिळत असून लसीकरणासाठी पुणे शहरातून नागरिक येत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत सुहास बाणखेले यांनी मंचर पोलिसांना निवेदन दिले आहे. लसीकरणाच्या साईटमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणी सायबर पोलिसांकडून कारवाईची मागणी त्यानी केली आहे. ग्रामीण भागातील लस ग्रामीण भागातील नागरिकांनाच मिळावी अशी मागणीही या पार्श्वभूमीवर केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपास केला जात असल्याचे सांगितले आहे.