महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात लसीचा तुटवडा; शहरात सलग चौथ्या दिवशी लसीकरण ठप्प - pune Vaccination news

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी लसीकरण बंद आहे. शहरात खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांना सरकारकडून लस पुरवणे 1 मे पासून बंद झाल्याने तिथले लसीकरण ठप्प आहे.

लसीकरण बंद
लसीकरण बंद

By

Published : May 4, 2021, 2:16 PM IST

पुणे - शहरात सलग चौथ्या दिवशी लसीकरण बंद आहे. शहरात खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांना सरकारकडून लस पुरवणे 1 मे पासून बंद झाल्याने तिथले लसीकरण ठप्प आहे. त्यातच सरकारी आणि महापालिका रुग्णालयात देखील लसीचा पुरवठा नसल्याने लसीकरण बंद आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू

दरम्यान, 45 वर्षावरील नागरिकांना होणारे लसीकरण पूर्णपणे बंद आहे. शहरातील दोनच लसीकरण केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालयात आधी नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत आहे. शहरात लसीकरणासाठी लस उपलब्धच नसल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेने केले होते. त्यानुसार आज लसीकरण केंद्रावर पूर्ण शुकशुकाट पाहायला मिळाला. लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने आज लसीकरण होणार नाही आणि पुढील आदेश येईपर्यंत, लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण बंद राहील।असे फलक लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आले आहेत.

महापालिकेने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू असल्याचे सांगितले असले तरी अत्यल्प प्रमाणात हे लसीकरण होत आहे. 1 मे रोजी केवळ 132 तर 2 मे रोजी 380 इतकेच लसीकरण करण्यात आले. महापालिकेने या वयोगटातील लसीकरणासाठी 5 हजार डोस राखीव ठेवले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details