पुणे- शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेचे प्रमाण पाहता पुणे शहराचा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. या टप्प्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली अनेक दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी आणि त्याबाबत आदेश काढले आहेत. तसेच पुणेकरांच्या प्रवासी वाहतुकीचा कणा असलेली बससेवाही आजपासून सुरू करण्यात आली आहे.
मोजक्याच ग्राहकांना प्रवेश
मागील दोन महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल सुरू झाल्यामुळे आज सकाळपासूनच ग्राहकांनी हॉटेलमध्ये गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. हॉटेल मालकांनीही अनलॉकसाठी तयारी केली होती. हॉटेलमधील टेबल-खुर्ची यांची स्वच्छता, संपूर्ण हॉटेलचे सॅनिटायझेशन करून हॉटेल ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होते. 50 टक्के क्षमतेने सुरू असणाऱ्या हॉटेलमध्ये मोजक्याच ग्राहकांना प्रवेश देण्यात येत आहे. याचबरोबर लॉकडाऊन काळात पुणे शहर व परिसरात पीएमपीएमएलची प्रवासी सेवा पूर्णत: बंद होती. मात्र, आजच्या अनलॉकमध्ये बस प्रवासी वाहतुकील परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.