पुणेपत्नीवर वाईट नजर ठेवून Evil Eye on wife of Accuse तिला वारंवार त्रास दिला आणि तिच्याशी अश्लील बोलल्याच्या रागातून महादेव दुपारगुडे याचा खून केल्याची घटना दहिहांडीच्या दिवशी जांभूळवाडी दरीपुलाच्या जवळ Murder in Jambhulwadi Daripula घडली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी Bharti University Police Performance पुढील ४८ तासांत तपासयंत्रणा कामाला लावत खुनाचा छडा लावला असून, तुषार मेटकरी, आशा मेटकरी, विनोद दुपारगुडे आणि किरण चौधरी यांना अटक केली आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत भारती विद्यापीठचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी दिली.
पोलिसांकडून तत्काळ कारवाई पुण्यातील भारती विद्यापीठ हद्दीमध्ये दरी पुलाजवळ एक अज्ञात इसमाची पोलिसांना बॉडी सापडली होती. तसा गुन्हादेखील भारती विद्यापीठमध्ये दाखल करण्यात आलेला होता. परंतु, त्या इसमाचा भावाने पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्याने हा माझा भाऊ असल्याचे सांगितले. पोलिसांनी पुढील तपासामध्ये त्या व्यक्तीच्या अंगावरील मार बसलेला आहे. त्याच्यामुळे मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आता त्या सर्व आरोपींना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.