पुणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सण हे निर्बंध मुक्त केल्यानंतर दहीहंडी सुद्धा मोठ्या जल्लोषात यावर्षी साजरी होणार आहे. सगळेच दहीहंडीचे मंडळ सुद्धा यासाठी जोरदार तयारी करत आहेत. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सुवर्णयुग तरुण मंडळाचा पन्नास वर्षाचा इतिहास आहे.
निर्बंधमुक्त दहीहंडी होणार साजरीज्या ठिकाणी दगडूशेठ गणपतीचे गणेशोत्सवामध्ये उत्सवा असतो त्याच ठिकाणी या सुवर्णयोग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव असतो. मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक कार्य केले जातात. तर सन्माननीय पाहुण्याच्या वतीने या ठिकाणी दहीहंडी उत्सव करण्यात येतो. कोरोना काळामध्ये सर्वच सणांमध्ये थोडीशी उदासीनता होती. त्यामुळे तरुणाचा उत्सव असलेला दहीहंडी उत्सव सुद्धा थोडासा निर्बंधामध्येच करावा लागल्यामुळे यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्याप्रमाणे कुठलेच निर्बंध नाहीत. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये सुवर्णयोग तरुण मंडळ दहीहंडी साजरी करणार आहे.
पुण्यातील सुवर्णयोग तरुण मंडळ हे यंदाच्या दहीहंडीला 75 शहीद कुटुंबीयांच्या पत्नींचा साडी चोळी देऊन करणार सन्मान 75 शहीद कुटुंबीयांच्या पत्नींचा साडी चोळी देऊन सन्मानयावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्यामुळे सुवर्णयोग तरुण मंडळ हे यंदाच्या दहीहंडीला 75 शहीद कुटुंबीयांच्या पत्नींचा साडी चोळी देऊन सन्मान करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे तीन वाजता दहीहंडी उत्सवाला सुरुवात त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे. सुवर्णयोग करून मंडळाच्या दहीहंडी मध्ये ठाणे , मुंबई, पुणे या ठिकाणचे वेगवेगळे गोविंदा पथक सहभागी होत असतात. परंतु ज्यांच्या आगमन प्रथम होते त्यांनाच या पथकाद्वारे मान्यता दिली जाते.दहीहंडी उत्सव हा निर्बंध मुक्त करायचा असला तरी जे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही नियम आहेत तशीच थरांची रचना असणार आहे. गोविंदा पथकांचे जे काही काळजी घ्यायची आहे त्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून यावर्षी सुद्धा दहीहंडी करणार असल्याचे सुवर्णयोग तरुण मंडळाचे अमोल चव्हाण यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचाDahihandi शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची दहीहंडी