पुणे पुण्यातील चांदणी चौक भागात सातत्याने वाहतूक कोंडीचा सामाना नागरिकांना करावा लागत असल्याचे पुढे आले आहे. याच वाहतूककोंडीमुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील अडकले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन या पुलाची पाहणीदेखील केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी Nitin Gadkari Statement on Chandni Chowk Flyover Demolished देखील याची दखल घेतली आहे. आज पुणे दौऱ्यावर असलेल्या मंत्री गडकरींनी चांदणी चौकातील उड्डाणपुल पुढील दोन तीन दिवसात पाडणार असल्याचे म्हटले आहे.
नितीन गडकरी यांनी चांदणी चौकमधील कामाची केली पाहणीकेंद्रीय वाहतूक रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथील चांदणी चौक भागांमध्ये चाललेल्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना मोठ्या सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, लवकरात लवकर काम करा परंतु या नागरिकांनी आता नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की आमचा रस्त्याला विरोध नाही. परंतु, आमच्या सर्विस रोडला चिटकूनच आमच्या कंपाउंड भिंत आहेत आणि त्यामुळे रात्री होणारा गाड्यांच्या आवाजाचा त्रास आम्हाला जास्त असतो.