पुणे नवीन कामगार कायद्यात New Labor Law कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आदी बाबींवर विचार करण्यात आल्याने नवीन रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. या कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव Union Labor and Employment Minister Bhupendra Yadav यांनी केले.
कामगार कायद्याची अंमजबजावणी चर्चासत्र नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेन्ट (एनआयपीएम) च्या National Institute of Personnel Management वतीने हॉटेल जे डब्ल्यू मेरीयेट J W Marriott येथे कामगार कायद्याची अंमलबजावणी या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील State Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे Labor Minister Dr Suresh Khade, युवा संकल्प अभियान आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गीते आदी उपस्थित होते.
मालक आणि कामगार यांच्यातील चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न सुधारण्य केंद्रीय मंत्री यादव म्हणाले, नवीन कामगार कायद्यानुसार स्त्री, पुरुष यांना समान वागणूक देऊन समान वेतन देण्यात येणार आहे. मालक आणि कामगार यांच्यातील चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून कामगारांचा दर्जा देण्यात येत आहे.