पुण्यात जबरी चोरी ! शेतकऱ्याचा बंगल्यातून 155 तोळे दागिने लंपास, 88 लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा हात साफ - शेतकऱ्याच्या बंगल्यातून 88 लाखाची चोरी
चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात असणारे 155 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, वेगवेगळ्या देशाची परकीय चलन, चाळीस हजारांची रोख रक्कम असा एकूण 88 लाख 38 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
![पुण्यात जबरी चोरी ! शेतकऱ्याचा बंगल्यातून 155 तोळे दागिने लंपास, 88 लाखांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा हात साफ शेतकऱ्याचा बंगल्यातून 155 तोळे दागिने लंपास](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12834671-858-12834671-1629520505481.jpg)
शेतकऱ्याचा बंगल्यातून 155 तोळे दागिने लंपास
पुणे- हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जबरी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतकऱ्याच्या बंद असलेल्या बंगल्यातून चोरट्यांनी तब्बल 88 लाख 38 हजार रुपयांचा ऐवजावर हात साफ केला आहे. चोरीची ही घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतकरी विवेक चोरघडे (वय 47) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.