महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरेंना 'भारतरत्न' द्या ! - नरेंद्र मोदी

केंद्र सरकार वीर सावरकर यांना भारतरत्न देणार, असे बोलले जात आहे. मात्र 'हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या', असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमर खालिद यांनी केले.

Hemant Karkare-umar Khalid
हेमंत करकरे-उमर खालिद

By

Published : Jan 18, 2020, 3:30 PM IST

पुणे - सीएए, एनआरसी, एनपीआर आणि धर्मनिरपेक्षता या विषयांवर 'संविधान बचाव समिती' पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, विद्यार्थी नेता उमर खालिद याने केंद्र सरकारला एक आव्हान केले. 'सरकार सावरकरांना भारतरत्न देणार असे बोलले जात आहे. मात्र 'हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या' असे खालिद यांनी म्हटले आहे.

हिंमत असेल तर हुतात्मा हेमंत करकरे यांना भारतरत्न देऊन दाखवा... उमर खालिद यांचे आव्हान

हेही वाचा... ...तर मोदींची जागा संसदेत नाही तर प्राणिसंग्रहालयात हवी

काय म्हणाले उमर खालिद ?

'हुतात्मा हेमंत करकरे यांचा आम्ही सन्मान करतो. मात्र, मोदीजी तुम्ही ज्या पोलिसांचा सन्मान करता, त्यात हुतात्मा हेमंत करकरे यांचा समावेश आहे का' ? असा सवाल उमर खालिद यांनी नरेंद्र मोदींना केला. तसेच 'भाजपच्या खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी करकरे यांना अपमानित केले. आता सरकार बोलत आहे की, सावरकर यांना भारतरत्न देणार. पण तुमच्यात हिंमत असेल, तर हेमंत करकरे यांना भारतरत्न द्या' असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमर खालिद यांनी केले आहे.

हेही वाचा... गणेश आचार्यचा सरोज खानवर पलटवार, समजून घ्या काय आहे नेमका वाद?

ABOUT THE AUTHOR

...view details